खेळ शब्दांचा
सकाळ मी, संध्याकाळ तूच
कविता तू माझी, कवी मीच तुझा
खेळ हा शब्दांचा, जुनाच नवा..
सोबतींची पहाट, आठवणींची रास
कल्पना तू माझी, कवी मीच तुझा
खेळ हा शब्दांचा, जुनाच नवा..
हातात हात, सोनेरी पाउलांची वाट
सखी तू माझी, सॊबती मीच तुझा
खेळ हा शब्दांचा, जुनाच नवा..
नभांची हि मैफिल, असमंतात रंगली
सरी तू माझी मेघ मीच तुझा जाहलो
खेळ हा शब्दांचा, जुनाच नवा..
सर्व काही असेच असते
प्रत्येक पानावर तूच असते
नयन जरी हसरे, ओलेचिंब झाले मन
आलिन्द तू माझी, निलय मीच तुझा
खेळ हा शब्दांचा, जुनाच नवा..