Marathi Quote in Poem by अनु...

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

रक्तसंबंध हवे कशाला,
जाणून घेण्यास भावना।
मैत्री अशी मिळाल्यावर,
उरला नाही कमीपणा ।

मैत्रीशिवाय दुनियादारी,
नात्याला ह्या माहीत नाही।
व्यवहारातलं देणं घेणं,
आपल्याला कळलं नाही।

रुसवे फुगवे सगळेच,
क्षणांचे खेळ नेहमीचे।
उपकाराची भाषा नाही,
नाही ते ओझे अपेक्षांचे।

अवखळ अल्लड मैत्री ही,
पावसासम भिजवणारी ।
दुःखाच्या लाटांवर नेहमी,
जीवननौका सांभाळणारी।

अविरत साथ ही आपुली,
आयुष्यभराची ही खात्री।
करावं लागतं समर्पण,
सहज मिळत नाही मैत्री।

अनु...🍁🍁

Marathi Poem by अनु... : 111737775
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now