प्रीत
वाऱ्याच्या मंद झुळकेने
उडणारे रेशमी केस तुझे
पावसात भिजुनी स्तब्ध झाले
तुला पाहता मन माझे
प्रेमरंगात न्हाले
तुला पाहता वाटे पाहतच रहावे
तुझे मनमोहक रुप डोळयात साठवावे
तुझ्याचसाठी हजारो जन्म घ्यावे
प्रत्येक जन्मात तुझ्याच प्रेमात पडावे
तुझ्यासाठी कोणाशीही नडावे
तुझ्याचसाठी दुनीयेशी लढावे
देवाला हे मागणे मागावे
जन्मोजन्मी तुझ्याशीच प्रीतीचे नाते जडावे