माय....!!
लई तापलं शिवारं
दिस आला डोईवरं
होते जीवा लाहीलाही
थंड आईचा पदर...
आला गेलां पाहुण्याची
कधी म्हणें पापिणीची
सवें काढतें नजर
माझा आईचा पदर...
माय सावली धरतें
स्वतः उन्हाशी राबतें
घेई दुःख अंगावर
धरी मायेचा पदर...
माझ्या सुखातच पाहें
तिचें सुख भरो राहें
माझें हित सर्वदूर
राखें आईचा पदर...
दूर राहीं कली काळ
त्याचे अंगी नसें बळ
होई विकार लाचार
जिथें आईचा पदर...