वृत्त- आनंदकंद
लगावली- गा गा ल गा ल गा गा , गा गा ल गा ल गा गा
तुजविण... मी उरत नाही..
वाटा जरी निराळ्या, मज कैफ ना शिकायत,
थोड्याच अंतराने, हे प्रेम सरत नाही।
तुजविण सदा कहाणी, भासे मला अपूर्ण,
करता वजा तुला मी, शून्य हि उरत नाही।
नसता तुझे अस्तित्व, पानगळ आज वाटे,
चैत्र असुन सुमने, मोहरून फुलत नाही।
नजरेत ध्यास होता, निर्व्याज सोबतीचा,
निरगाठ बांधुनी का, मज कैद करत नाही?
होती सदैव माझी, बहरत अमोघ प्रीती,
मनभावणी तुझ्या का, अनुबंध मुरत नाही?
अनु...🍁🍁