आई...
तुझे डोळे जणू
शांत सागराचा किनारा
उत्तरेत चकाकणारा
अखंड ध्रुव तारा
तुझे डोळे जणू
मंद गुंगावणारा वारा
पावसाळ्यात फुललेला
मोराचा पिसारा
तुझे डोळे जणू
भिजलेल्या मातीचा सुगंध
वाळवंटात मिळणाऱ्या
झऱ्याचा आनंद
तुझे डोळे जणू
सप्तसुरानी बनलेला राग
सुंदर फुलांनी बहरलेली
सप्तरंगी बाग
तुझ्या डोळ्यात जणू मला
संपूर्ण विश्व दिसते
माझ्या हृदयात आई
नेहमी तूच असते..
- ©प्रियंका अरविंद मानमोडे