Marathi Quote in Poem by भावना कुळकर्णी

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

आयुष्यावर बोलू काही...

आयुष्यावर बोलू काही ,
लेका, ही काही गंमत नाही
कधी तरी जरा
मागे वळून बघशील
किती वेङे होतो आपण
हे आठवून हसशील
छोट्या छोट्या गोष्टीचं
किती वाईट वाटायचं
कुणी खोट सांगितले तरी
खर म्हणून पटायचं
किती यायचा उगी
इवल्याशा नाकावर राग
आई म्हणायची ना मग
तुला हवे तसे वाग
रङत रङत केलेले हट्ट
कधी भूताला घाबरुन
आजोबांच्या कुशीत घट्ट
आता वय सरतय
खुप काही कळतय
कुठेतरी काही सलतय
कधी मन उगाच छळतय
लेका ही गंमत आहे म्हणून
आयुष्य आता कुठे उमगतय
गंमतीचा भाग सोङ
जगण आता जवळ येतय
आयुष्य मात्र निसटतयं...


भावना कुळकर्णी.
नाशिक.

Marathi Poem by भावना कुळकर्णी : 111615501
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now