दु:खाला आठवताना
काही अवकाशाने मन बोलले मनाला,
आज विसरला असावा तो या दाराला.....
मौजदुगीत तुझ्या व्याकूळ होते सारे,
नसतानाही तुझेच भास का भासावे रे .....
सुखाने हृदयाचे स्पंदने जरी वाढले ,
दुःखांच्या कोपऱ्यास सुने सुने वाटले ....
नको असशील जरी तु या देहाला,
हृदयाचा एक कोपरा तुझ्यासाठी तसाच मी राखला...