रात्र संपणार आहे कारण
सूर्योदय होणार आहे
मेघ दाटले आहेत कारण
पाऊस पडणार आहे
मातीला गंध सुटणार आहे कारण
धरती अंकुरणार आहे
वेदना असाह्य होणार आहेत कारण
आई पण येणार आहे
पाने गळून पडणार आहेत कारण
वसंत बहरणार आहे
बालपण सरणार आहे कारण
तारुण्य येणार आहे येणार आहे
म्हातारपण येणार आहे कारण
मोक्ष मिळणार आहे.