Marathi Quote in Poem by Na Sa Yeotikar

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

।। कोरोना ।।

कोरोनाचा आकडा
रोजच वाढतो आहे
काळजीने मनुष्याचा
जीव काढतो आहे

लस मिळेपर्यंत कोरोना
आटोक्यात नाही येणार
असा वाढतच राहिला तर
अनेकांचे जीव ही घेणार

याची काळजी करण्यापेक्षा
काळजी घेणे हाच उपाय
उगीच बाहेर जाण्यापेक्षा
घरातच राहू द्या ना पाय

एकामुळे दुसऱ्यांचा यात
जातो हकनाक बळी
लॉकडाऊनचे नियम
जरा उतरू द्या गळी

काही दिवसांत येणार
आपल्या सर्वांचा सुखकर्ता
देवा, तुझ्या आगमनापर्यंत
संपू दे कोरोनाची वार्ता

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769
दिनांक 08.07.2020 09:10pm

Marathi Poem by Na Sa Yeotikar : 111501506
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now