खूप दिवसांपासून असे जगावस वाटतय...
जिथे नसावी फोनची कटकट आणि टीव्ही चा गोंगाट.
समाधानाचे शहारे घेऊन यावी थंड हवेची झुळुक अलगद तिथे.
फक्त शांतताच असावी सोबतीला,पक्षांचा किलबिलाट व रात किड्यांची किरकिर ही असावी अधून-मधून.
निसर्ग सौंदर्य मनमुराद लुटायला यावे तिथून मावळतीचा सूर्य, पाखरांचे थवे, छोटे-मोठे धबधबे आणि बरेच काही...
खूप दिवसांपासून असे जगावस वाटतय सगळ् टेन्शन विसरून निसर्गात रमावसं वाटतंय.