तू वाळीत टाकलेल्या हरेक वस्तू ,
जळक्या , सडक्या , कुजक्या ,
ज्यांच्याशी संपलाय तुझा संभोगाचा करार .
अश्या सार्या वस्तूचा गाळ जमलाय
इथं पार तळाला .
जो दिवसेंदिवस वाढतोय , सडतोय .
.
.
काल इथून जाताना बघितलं मी तुला !
स्वच्छ कोर्या शहरात राहायला लागला तसा ,
तुला वास यायला लागलेला माझा .
त्या महागड्या परफ्युमचे शिडकावे मारलेला,
तुझा रुमाल .
तुझ्या वासनेचा वास घेणार्या नाकावर
झाकून जात होतास ना तू ?
.
.
येशील येशील थांब ।
तुझ्या संपलेल्या भोगाच्या सार्या वस्तू ,
सार्या सांभाळून ठेवतोय . घाबरु नकोस !
.
.
मरुदे माझ्यातील सार्या जिवंत भावना .
कोरडा झालो तर बेहत्तरच !
पाच पन्नास निष्पाप देह दिसतील ,
तडफडत मरुन पडलेली ,
त्यांचा मरणाचा #उग्र वास जाईल ना नाकात ...
तेव्हा ,
तेव्हा त्या परफ्युमचा वास थिटा पडेल आपोआपच
अन्
लवकरच सोडतील श्वासेही,
तुझ्या त्या उच्चभ्रू नाकाला .
त्यांना सारं सहन होतं . पण ?
पण हत्येच अोझं कोणाला पेलवत ?
.
.
एकाच्या सुटकेसाठी एकाचा बळी हवा !
तो तुझाच घेणार .
नको करु चिंता चितेची ..
तुझी माणसं ,
ती इथच आणून फेकतील तुला .
.
.
तेव्हा ,
तेव्हा जाळेल मी तुला ..
त्या सार्या गोष्टीला घेऊन ,
ज्यात असतील ,
तू वाळीत टाकलेल्या हरेक वस्तू ,
जळक्या , सडक्या , कुजक्या
ज्यांच्याशी संपलाय तुझा 'संभोगाचा' करार .. .
.
©मुक्तज्ञानी
#उग्र