Marathi Quote in Quotes by Na Sa Yeotikar

Quotes quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

चुकीचा पुतळा

माणूस हा चुकीचा पुतळा आहे म्हणून वारंवार चूका करणे देखील योग्य नाही. चूक झालेली कळल्याबरोबर त्याविषयी लगेच माफी मागितल्यास चूक फार मोठी होत नाही किंवा त्याचे परिणाम भोगावे लागत नाही. म्हणून चूक झाली म्हणून अरेरे करण्यापेक्षा माफी मागून पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. चुकातून शिका असे ही म्हटले जाते. जो माणूस कधीच चुकत नाही सहसा तो काहीच करत नाही असे बोलले जाते. काही करणाऱ्या माणसाच्या हातून चुका होत असतात. एकदा झालेली चूक पुन्हा परत होऊ न देणे ह्यातच खरे शहाणपण आहे. शाळेत शिक्षण घेत असतांना शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या अनेक चुका निदर्शनास आणून देतात कशासाठी तर त्या चुका पुन्हा होऊ नये म्हणून. परत परत तीच चूक आपण करत राहिलो तर त्यास घोडचूक म्हटले जाते. रस्त्यावरून जातांना एखाद्या ठिकाणी गतिरोधक आहे किंवा खड्डा आहे याची एकदा माहिती कळल्यावर चालविणारा त्याठिकाणी सावकाश चालवितो किंवा अलर्ट तरी होतो. जीवन सुद्धा असेच आहे, चुका होत नाहीत असे अजिबात नाही. मात्र झालेल्या चुकांवर पांघरून टाकून झाकून ठेवल्यापेक्षा ती चूक मान्य करून परत ती चूक कधीच करणार नाही याची शपथ घेणे महत्वाचे आहे. महात्मा गांधीजी यांचे माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचल्यास आपणांस महात्मा गांधीजीनी देखील जीवनांत खूप चुका केल्याचे दिसून येते. तरी देखील ते महात्मा झाले कारण त्यांनी चूक मान्य केली आणि परत तशी चूक कधी ही केली नाही. सत्यावर त्यांचा प्रगाढ असा विश्वास होता. जीवनात अश्या काही चुका घडून जातात ज्यामुळे आपले आयुष्य सारे बरबाद होऊन जाते. अशी चूक आपल्या हातून होणार नाही याची काळजी प्रत्येकांनी घेणे आवश्यक आहे. समूहाचे जीवन सुखकारक आणि आनंददायी व्हावे म्हणून काही नियमावली तयार केली जाते. त्या नियमांचे तंतोतंत पालन करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे म्हणून नियम तोडण्याची चूक कधी ही करू नये. दारू पिऊन वाहन चालवू नका असे अनेकदा सांगितले जाते तरी देखील ती चूक काही युवकांच्या हातून घडते. दारूच्या नशेत गाडीचे अपघात होते, त्यात त्याचा जीव तर जातोच उलट ज्याला याने धडक दिली त्या निष्पाप व्यक्तींचा देखील जीव जातो. म्हणून अशा सामाजिक आनंदाला विरजण लावणारे चुका आपल्याकडून घडू नये, एवढं विचार प्रत्येकांनी करायला हवं. समाजात शांतता आणि आनंदीमय वातावरण निर्मितीसाठी आपली छोटीशी चूक देखील इतरांना दुःख देऊन जाते, याची जाणीव आपल्या सर्वांना असायलाच हवी.

- नासा येवतीकर, 9423625769

Marathi Quotes by Na Sa Yeotikar : 111445367
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now