ती फुलराणी
ती वाऱ्यासारखी अवखळ बेधुंद आपल्यातच जगणारी, जगरहाटी पासून दूर नाजूक काळ्यात स्वतःला शोधणारी, सुवासात स्वतःला हरपणारी,
भालावरच्या बटेसारखी अवखळ,
रुसलेल्या ओठाइतकी सौम्य,
जणू काही उडणाऱ्या फुलपाखरासारखी स्वरांच्या अंजली प्रमाणे आपले सूर एका फुलावरून दुसर्या फुलावर ठेवणारी,
त्यातच स्वतःला सावरणारी,
रात्रीच्या शांत वेळेत लख्ख प्रकाशाने आपल सौंदर्य उजळवणारी,
अखंड तेजाने विश्व व्यापून टाकणारी,
मधासारखे बोल बोलून वेड लावणारी...,
ती फुलराणी........