#भेटणे
वेड मज लाऊन जाते
क्षणभराचे हे भेटणे
हुरहूर ठेवून जाते
क्षणभराचे हे भेटणे
सांग कसे विसरायचे
मनास काय सांगायचे
घोर मना लाऊन जाते
क्षणभराचे हे भेटणे
आज सांग ते शेवटचे
काय करु या जिंदगीचे
बोल काय ते करायचे
झोप उडवून की जाते
क्षणभराचे हे भेटणे
.... प्रल्हाद दुधाळ पुणे
9423012020