Marathi Quote in Poem by Ishwar Trimbak Agam

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

सावर रे...!

मन उदास उदास,
त्याले किती सावरू।
आल्या किती अडचणी,
कधी जिद्द ना हरू।

कधी सुख कधी दुःख,
पाठशिवनीचा खेळ,
एकमेका साथ करू,
घालू भविष्याचा मेळ।

परिस्थिती काही असो,
परी डगमगू नको।
साथ असेल सदा ही,
उगा चिंता करू नको।

वाईट माणूस नसतो,
सारा वेळेचा हा खेळ।
साथ सोडू नये कधी,
येईल सुखाची ग वेळ।

कष्ट करत रहावे,
कुणा बोल लावू नये,
द्यावा मदतीचा हात,
कधी नाही म्हणू नये।

(बहिणाबाईंच्या कवितांवर आधारित, एका उदास झालेल्या मित्रासाठी लिहिलेली कविता।)

- ईश्वर त्रिंबकराव आगम

Marathi Poem by Ishwar Trimbak Agam : 111338932
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now