नवीन वर्ष जवळ आलंय प्रत्येकाने काही न काही संकल्प केलेच असणार सरत्या वर्षाचा आढावा घेऊन आता ह्या येणाऱ्या नवीन वर्षात स्वतःला काय द्यायचं आहे याचा विचार केलाच असणार. खर तर हा खूप मोठा प्रश्न असतो की नेमकं काय संकल्प करायचे आणि त्याहून मोठा प्रश्न हा की आपले संकल्प आपण पूर्ण कसे करणार ? काय होत घ्यायला आपण खूप मोठे संकल्प घेतो आणि वेळ आली की मग एकही संकल्प पूर्ण होत नाही त्यासाठी मग आधी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे एक वही पेन घेऊन तुम्ही ठरवलेले सगळे संकल्प लिहुन काढा त्यानंतर तुम्हाला आधी कोणत्या ध्येयावर काम करायचं आहे ते ठरवा ध्येय लहान असतील तरच चांगली जस डेली 30 मिनिट फिरणे तर हे तुमचं छोटस ध्येय झालं असे लहान लहान ध्येय घ्या त्यासाठी योजना बनवा तुम्हाला कस जमेल तसं स्वतःला आठवडा महीना अशी डेडलाईन द्या आणि मग आपला संकल्प ध्येय पूर्ण करायला वेळ द्या . कुठलंही काम हे अवघड किंवा करता न येण्याजोग नसत त्या साठी लागतो तो फक्त ध्यास एकदा का ध्यासाने काम करायला सुरुवात केली की आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही