. "श्रीसुक्त"
"ऋचा १६"
यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् | सूक्तं पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत् ||१६||
अर्थ:--य:जो,श्रीकाम: संपत्तीची इच्छा करणारा असेल,स:तो शुचि--शरीराची स्नानादि मार्गानी स्वच्छता करून,स्वच्छ
होऊन,प्रयत:-मन स्वच्छ ठेऊन,स्थिर करून, भुत्वा:-वर सांगितल्या प्रमाणे,शरीर व मन यांची शुचिता संपादन करून,अन्वहम:-दररोज,आज्यम:-धृत,तूप ते जुहूयात:-
हवन करावे,तुपाचा आहुती द्याव्यात,(अर्थातच आज्याहुती द्याव्यात हे सांगितल्यामुळे वैश्वदेव विधीने अग्नी संस्कार करून त्यांच्या आहुती द्याव्यात
हे ओघानेच सिद्ध झाले) तसेच पंचदशर्रच च:-पंधरा ऋचा असणारे हे
श्रीसूक्त,सततम--निरंतर,जपत:--जप करावा (श्री सुक्ताचा सतत रोज जप करावा आणि प्रत्येक दिवशी श्रीसूक्तानेच आज्याहुति देऊन हवन करावे,जर संपत्तीची इच्छा असेल तर, असा आशय)
श्रीसुक्तात जी भौतिक ऐश्वर्याची प्रार्थना
केली आहे त्याचा संबंध मनाशी आहे म्हणून या मंत्रात'शुचि:'आणि 'प्रयत:' या
दोन पदांनी रहस्य विशद केले आहे.
पंधरा ऋचा असणाऱ्या या श्रीसूक्ताचा सतत जप करावा हे सांगून द्रव्ययज्ञाबरोबर जपयज्ञहि व्हावयास हवा हे सांगितले आहे.फल प्राप्ती कर्त्याच्या मनोभूमीवर अवलंबून आहे म्हणून ज्या प्रमाणात उपसकाची मनोभूमी विशुद्ध होईल,त्या प्रमाणात त्याला फळ मिळेलच.
"तस्मान्मंत्रं जपेद्योगी यत:शुद्धेन्द्रियक्रिय:।
या ठिकाणी श्रीसूक्त समाप्त झाले.