आरे वाचवा रे
बोलत नाही म्हणू न
मारून टाकणार कारे
विकास पाहिजे म्हणून
का तोडणार आरे
जगण्यासाठी तुम्हाला
देतो मूलभूत सारे
प्रदूषण नको कुणाला
म्हणून जगतो आरे
निसर्गाचा समतोल
नीट सांभाळून धरे
वन्यजीवांना जपतो
अरे तोच तो आरे
निवडणुकांच्या तोंडावर
मेट्रोचे दाखवतात ताशेरे
पण जिंकून मात्र येणार
निसर्गाचेच प्रबळ वारे
कितीही बोला नुसतं
आश्वासनं फार द्या रे
पण श्रीमंताच्या सोयीसाठी
नका तोडू ना आरे
विकासाकडे जाताना
संस्कृतीकडे नको पाठमोरे
ज्यांच्यामुळे सारे जगतोय
त्यालाच का मरावता रे