मैत्री ही असावी जिवाभावाची.
मैत्री ही घट नातं विनण्याची.
मैत्री हीं असावी निखळ प्रेमाची.
मैत्री नसावी वेगळी करण्याची.!!१!!
हृदयाच्या कोपऱ्यात असतो कोपरा
मनाच्या आठवणीत हसरा चेहरा
डोळ्याच्या अश्रूंत असतो आनंदाचा झरा
रोजच्या आयुष्यात तूंच मित्र खरा
मैत्री ही असावी जिवाभावाची.
मैत्री ही घट नातं विनण्याची.
मैत्री हीं असावी निखळ प्रेमाची.
मैत्री नसावी वेगळी करण्याची.!!२!!
सुख दुःखात वेळेला येतो मदतीला
तुज्या सोबत राहुन स्वभाव बदलला
माझ्या भावना तुला सांगायला
तुजा आधार आहे माझ्या जीवाला
एकमेकांना समजून घ्यायला
मैत्री ही असावी जिवाभावाची.
मैत्री ही घट नातं विनण्याची.
मैत्री हीं असावी निखळ प्रेमाची.
मैत्री नसावी वेगळी करण्याची.!!३!!
कधी चुकले माप केले मित्राला
कधी नजरेसमोर नाही दिसला
असं वाटतं गेला कुठे फिरायला
तू असावा असं वाटतं मनाला
एकटा नसावा आसरा कुणाला
मैत्री ही असावी जिवाभावाची.
मैत्री ही घट नातं विनण्याची.
मैत्री हीं असावी निखळ प्रेमाची.
मैत्री नसावी वेगळी करण्याची.!!४!!
तू कधी सांगशील जाऊ फिरायला
मित्राशिवाय अर्थ नाहीं जगण्याला
भेटल्यावर आठवण येईल प्रत्येक क्षणाला
हसतमुख राहूं प्रत्येक दिवसाला
खरा आनंद मिळवून देईल माझ्या
सोबत असणाऱ्या मित्राला
मैत्री ही असावी जिवाभावाची.
मैत्री ही घट नातं विनण्याची.
मैत्री हीं असावी निखळ प्रेमाची.
मैत्री नसावी वेगळी करण्याची.!!५!!