Marathi Quote in Good Night by Suryakant Majalkar

Good Night quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

रात्रीच्या समया


नखरेल तुझी ही चाल

बोलणे तुझे मधाळ

डोळे इष्काचा प्याल

केलेस मजला घायाळ ||


मजला सांग नवतरुणी

कशी अवतरली अगंणी (१)


तु रंगात येना जराशी

अधर जुळती अधराशी (२)


लाज तुझी मला गमली

ह्रदय तार तु छेडली (३)


नको दवडूस वेळ आता

होईल पहाट आता (४)


गोरी तुझी ग काया

काय करशी रात्रीच्या समया (५)


मुक्त उधळ तुझे हास्य

उलगड प्रेमाचं रहस्य (६)


काय उपमा देऊ तुजला

चांद नभी खुद्कन हसला (७)


तु परी तु अप्सरा

कोण असशी सांग मजला (८)

Marathi Good Night by Suryakant Majalkar : 111177142
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now