#काव्योत्सव 2.0
स्त्री
दुनिया ही गोल असते
पण स्त्रीच चार भिंतीतलं
रहस्यच तिच्या साठी खोल असते
सीमा रेषा बनते तिची घरातलाच उंबरठा
अन् घरासाठी करते ती
स्वप्नांचा त्याग मोठा
प्रत्येक वेळेस झुकतं माप
तिच्या वाटेला येतं
अन् खुप काही करायचं
हे मनात राहुन जातं
घरासाठी तिची नेहमीच असते तडजोड
त्या व्यतिरिक्त तिला कसलीच नसते का ओढ?
आपल्यातल्या गुणाचं कधीतरी
कौतुक व्हावं असा असतो तिचा अट्टाहास
पण त्याच गुणांना मारुन टाकतो
संसाराच्या दोरीचा फास
सा-यांची दुःखं वाटुन घेत
सा-यांनाच आपलंस करते
पण तिचं दुःख वाटुन घ्यायला
मात्र तिचं आपलसं अस कुणीच नसतं
आलेल्या संधीचं सोनं करायला
ती घरच्यांना शिकविते
अन् स्वतःकडे आलेल्या संधीला
घरच्यांसाठी "पुन्हा कधीतरी ये" म्हणते
अशी असते ती पाण्यासारखी
क्षणात सारे व्यापूनी घेते ना असतो रंग तिला ना असतो वास ओतावे ज्याच्यात तिला ती मिसळुन जाते खास.
विनंती म्हात्रे खारपाटील.