MATRUBHARATI marathi
#KAVYOTSAV_ 2
# मराठी कविता
कविता- किती रम्य किती सुंदर
----------------------------------- --
किती रम्य किती सुंदर
जग तुझ्या नजरेतले
डोळ्यात तुझिया दिसे
हेच माझे जग असे
मन माझे इथेच रमले
जग तुझ्या नजरेतले
निर्मळ मन तुझे जसे
नजर ही अशीच असे
पहात रहावे तुज सवे
जग तुझ्या नजरेतले
किती रम्य किती सुंदर
जगणे तुझ्यामुळे झाले
कुशीत तुझ्या पाहतो
जग तुझ्या नजरेतले
किती रम्य किती सुंदर
जग तुझ्या नजरेतले
--------------------------------
-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
--------------------------------