सत्य
मी चालतो रस्त्याने
दुनिया वाट लावत चालते
पायाखालची सरकणारी माती आता
मला अनोळखी वाटते
टोचणारी आर्त वेदना
खोलवर सलत राहते
सवय झाली कायमची आता
कुरुप एकसारखेच खुपत असते
मी ओळखला प्रत्येकाचा खरा चेहरा
सावलीचीही आता भीती वाटते
कासरा जरासाच ओढलेला
हुकुमाचा गुलाम जो तो आहे
जागा पहा जानवर माणसातला
पण ह्रदयाचा पत्ता हरवला आहे.
©मवि