#kavyotsav2
तुझी नि माझी प्रेम कहाणी
अंधारलेल्या या आकाशामध्ये
हे लुकलुकणारे तारे....
तू समोर असताना माझ्या
अवती भवती वाहतात प्रेमाचे वारे....
चांदण्या शिवाय चंद्र अधुरा आहे
या आकाशाच्या पटलावर...
तसा मी तुझ्या शिवाय एकटा आहे
या आयुष्याच्या वाटेवर...
चंद्राच्या मनात फक्त
चांदण्याचचं प्रेम वसतं...
चंद्र चांदण्याच्या या प्रेमात
मला आपलं प्रेम दिसतं...
आपल्या प्रेमात असलेला
रूसवा फुगवा या
चंद्रामध्ये ही आहे...
पौर्णिमेला तो हसतो
आणि अमावस्येला तो रूसतो
जसा चंद्र दूर नाही राहू शकत चांदण्यापासून....
तसा मी ही दूर नाही राहू शकत
सख्ये तुझ्या अस्तित्वा पासून...
आज असणारी तुझी ही सोबत
कायम अशीच राहावी...
अंधारलेल्या आभाळातली
ही प्रेम कहाणी तुझ्या सोबत
तुझ्या खांद्यावर हात ठेवून
वर आभाळामध्ये पाहावी...
- मनिष चांदले