बाप
ज्याच्या कष्टाची जाणीव,
हाताच्या रखरखीत पणाने होते,
तो बाप असतो.
मुल मोठं होताना,
कौतुक करणारी आई असते,
पण भविष्याची काळजी करतो,
तो बाप असतो.
काटेरी वळणावर पाऊलवाट शोध,
अस म्हणून निर्दयी वाटणारा,
पण आयुष्याचे असंख्य आव्हाने,
पेलण्याची शक्ती देणारा बाप असतो.
कठोर वागण्यात प्रेम असत,
आणि खरच आयुष्य नेमकं काय असत,
हे शिकवतो तो बाप असतो.