माझे सत्तर वर्षाचे जीवनात काही असे अनुभव आलेत कि ,त्या अनुभवांना शेर केलो तर , बरेच जणांना उत्साहदायक मार्गदर्शन मिळेल असं मला वाटतो. म्हणून हा एक पहिला प्रयत्न . मी एक साधा कारकूनाचा मुलगा. आई, वडिलांच्या पुण्याई मुळे इंजिनीरिंगला सरकारी सीट, माझ्या स्वतःच्या गावात मिळाली, पन्नास वर्षां पूर्वी . पाच वर्षात मेकॅनिकल चा पदवी घेऊन बाहेर पडलो .त्या काळात औद्योगिक मंदी असल्या मुळे नौकरी मिळणे फार अवघड होता.सहा महिने पर्यंत नौकरी सोडा, मुलाखतीचा सुद्धा चिन्ह दिसेना.कंटाळून बहिणीचे गावाला जाऊन आराम करत असताना, एक दिवस माझा धाकटा भाऊ कलबुर्गीहून येवून सांगतो कि मला ३१ पर्यंत नौकरीला रुजू व्हायचा आहे.जीवनातली पहिली जबरदस्त आश्चर्य !! मुलाखत न देता अपॉइंटमेंट लेटर येणे हा आई वडिलांच्या चांगले कर्माचे फळ नसेल तर अजून काय असणार? कारण माझे कर्माचे अकाउंट सुरूच झालं नव्हतं.त्याकाळी सरकारी अँप्रेन्टिस योजनेत मुलाखत न घेता बी.ई. चा निकालावरून निवड झाली होती , ते पण माझ्या आवडता देव श्रीरामाचा गावी म्हणजे नाशिकला .दुसरा अनुभव माझ्या मेहुण्याची नौकरी . तो पण साधा,सरळ , मध्यम वर्गीय कुटुंबातला.बी.कॉम. पूर्ण केला होता. त्याचा गाव नांदेडला चांगली नौकरी मिळाली नव्हती म्हणून सोलापुरात एका कंपनीत सर्व्हिस करत होता. मन काही रमेना.त्याला पाहिजे होत बँकेची नौकरी.तो पर्यंत त्याचे वय २८ चा जवळ आली होती. त्याची आई म्हणजे माझे सासूबाई नांदेड मुनसिपालिटी मध्ये सदस्य होते.त्यांनी ३/४ गरजूवंत महिलांना, निस्वार्थ मनाने शिक्षकांची नौकरी मिळवून दिली होती.ह्या त्यांचा निष्कामकर्माचा फळ , म्हणून त्यांचा मुलाला मुंबईत एका परदेशी बँकेत कारकून म्हणून नौकरी मिळाली. ह्या साठी त्या बँकेत काम करणारा एक दक्षिण भारतीय ऑफिसर नी निस्वार्थपणाने प्रयत्न करून माझा मेहुण्याला नौकरी मिळवून दिली.म्हणून मित्रानो मी सांगतो, चांगले कर्म करा चांगले फळ मिळावा आणि बघा ह्याच डोळीं ह्याच जन्मी सत्कर्माचे फळ.