Marathi Quote in Romance by Aaryaa Joshi

Romance quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

एक झुळूक येऊन गेली...
एकाच कळीला उमलवून गेली....
कळी हसली सुखाने
न्हायली तृप्तीच्या आकंठतेने
इतर कळ्या पाहत राहिल्या
आपापसात बोलत राहिल्या
कुठली झुळूक अशी आली
जी केवळ हिलाच बिलगली???
फूल झालेली कळी हसली
इतर कळ्यांना सांगू लागली
माझे गुपित तुम्हाला सांगते
माझ्या मनीचं गीतच गाते
ही झुळूक माझीच आहे
तिच्या माझ्यात अभेद आहे
झुळूक माझ्या आतच होती
मऊशार पाकळ्यात दडली होती
हळूच तिला मीच वाट दिली
अद्वैताची किमया घडली
पाकळ्या पाकळ्यातून कळी उमलली!!

Marathi Romance by Aaryaa Joshi : 111078712
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now