आयुष्य म्हणजे पत्त्यांचा बंगला
कधी नीट जातो रचला तर कधी क्षणात कोसळलेला...
आयुष्य म्हणजे उब शेकोटीची
जवळ असताना थंडीला पळवणारी पण लांब जाताक्षणी पुन्हा कुडकुडवणारी
आयुष्य म्हणजे एक आरसाच
भूतकाळ आणि भविष्यकाळ दाखवणारी जणू
वर्तमानाची काच
आयुष्य एक स्वप्न
कधी निजेत सुखावणारं तर कधी नीज पाणावणारं
आयुष्य एक झाड
हसर्या हिरव्या पानांचं... पिवळ्या केशरी पानगळीचं
आयुष्य म्हणजे मीच भेटते माझी मला
आसूसुन जगताना... जीवनगाणं गुणगुणताना