तू नाळ संस्कारांची, तू आशा यशेच्या गाथेची
तू निर्मल दरी मांगल्याची, तू आई कृतज्ञतेची
तू माळ सन्मानाची , तू गोडी प्रत्येक नात्यांची
ऐक आर्त हाक तुझ्या गर्भातील छकुलीची
तू वादळ सांभाळ गर्भातली, मुरगड मान या अन्यायाची
दे शिकवण मुलीला मूल्यांची, दे आठवण तिला आईच्या आत्याचाराची
चुलीवऱ्याच्या धुरासोबत स्वप्न बघ उंच नभाची
पाळण्याच्या दोरीसोबत हाती घे धुरा खांबीरतेची
तू नाळ संस्कारांची, तू आशा यशेच्या गाथेची
तू निर्मल दरी मांगल्याची, तू आई कृतज्ञतेची
- समीक्षा गाडगे