Marathi Quote in Thought by Aarti Khurape

Thought quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

संस्कार

खरच्ं,कधी आपण विचार केला आहे का की आपल्या मुलांवर कश्याप्रकारे त्यांच्यावर संस्कार होत आहेत याचा?
सर्वात जास्त संस्कार हे आई-वडिल यांच्या कडुन होत असतात. आत्ता प्रश्न पडला असेल की कसा?
तर मुल ही आई-वडिलांचे अनुकरण करतात. ते कसे वागतात, बोलतात, दुसर्याला कसे वागवतत. या सगळ्या गोष्टी मुलं पहात असतात.
अप्रत्यक्षरित्या मुले ही तेच अनुकरण करायला लागतात. तुमच्यासारखे वगायला लागतात.
काही वेळेस आपले आणि दुसर्या व्यक्तींमध्ये काही कारणास्तव वाद चालू असतात.
त्यावेळी आपण त्या व्यक्तीसोबत बोलत नसतो, त्याला नावे ठेवत असतो. या सगळ्या गोष्टींचे आपली मुले अप्रत्यक्षरित्या हे अनुकरण करत असतात.
या आजच्या जगात अजुन एक गोष्ट पहायला मिळत आहे, जर एखाद्या आई-वडिल यांचे एका व्यक्तीसोबत काही वाद झाले असतील, तर ते आपल्या मुलांनासुद्धा अप्रत्यक्षरित्या त्यामध्ये सामिल करतात, "तू त्यांच्यासोबत बोलायच नाही" असे सांगून रिकामे होतात.
यात ती व्यक्ती आणि हा मुलगा यांचा यात काही संबंध आहे का? या लहान वयातच अश्या प्रकारे संस्कार होत असतात. या सर्व गोष्टींचा विचार हा प्रत्येक आई-वडिल यांनी करयला हवा.
(शेवटी या मध्ये एक उदाहरण दिले आहे, काही वेळा काही व्यक्ती वाईट असतात म्हणून आपण लांब असतो त्यांच्यापासून तेव्हा मुलांना दुर ठेवणेच योग्य असते. पण ती व्यक्ती चांगली असेल, आणी आपण चुकलेलो असू तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा.)

Marathi Thought by Aarti Khurape : 111068111
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now