आज्जी जेव्हा म्हटली ना, हिजड़्यांसारख नको हसू!
खरंतर खूप राग आला होता.
डोळ्यांत टचकन पाणी आल होत.
तशीच उठून मी घरातली कामे आवरत बसले.
मनात खूप सारे प्रश्न आहेत.
माहिती नाही उत्तर मिळेल का अन् उत्तर मिळून ही काय फायदा?
आपण लोकं फक्त short films बनवून पुढे जाऊ, award मिळवून भाव खाऊ. कविता, कथा लिहू....
कौतुक सोहळे ही होतील; बाकी त्या लोकांची परिस्थिती तशीच. ना घरात स्थान ना समाजात.
"गलतियाँ तो भगवान से भी होती है अब यही देख लो किसीको गलतीसे ही सही हिजड़ा बना देता है।"
एक किस्सा आठवलाय!
सांगु?
आज जेव्हा मोठ्याने हसताना आज्जी रागवली ना तेव्हा खरंच तीची आठवण झाली.
नाव नाही माहित काय आहे तिच. ती ना सिग्नलवर उभी राहते. पुरूषांकडुन पैसे घेते. तेच आहे तीच काम.
काॅलेजला जाताना देवळाई चौकाच्या सिग्नल वर रोज गर्दी पाहते. निरिक्षण करते. घाबरते ही. हो खरंच घाबरते. नटलेल्या, सुंदर सुंदर साड्या नेसलेल्या, भडक लिपस्टिक आणि जाडसर काजळाची रेष, हातभर बांगड्या, आणि ती मोठ्ठी टिकली. साडी एकदम बेंबीच्या खाली अगदी...
मोठ मोठ्याने टाळ्या वाजवत फिरणार्या स्त्रीया? नाही. . पुरूष? नाsss, नाही.
ते माणसे! माणूस? हो समाजाचा एक दुर्लक्षित वर्ग.
हिजड़ा!!!
हिजड़ा, शिवी दिल्यासारख वाटत ना!
मला ना या हिजड़्यांची खूप भिती वाटते.
दुरून बघितल्यावर ही आणि जवळपास बघितल्यावर ही.
एक दिवस काॅलेज मधून घरी येताना एका रेस्टॉरंट मध्ये मी आणि माझी मैत्रीण गेलो.
ज्युस ची ऑर्डर दिली. मोबाईल मधून डोकं वर काढत रेस्टॉरंटभर नजर टाकली. नकळतपणे लक्ष गेल मागच्या कोपर्यात ती/ तो रडत होती / होता.
आमची नजरानजर झाली. मी खूप घाबरले होते पण कस तरी खोटं हसू चेहर्यावर आणतं are you OK? म्हटले आणि ती ही डोळे पुसत हसली. Yeah! I'm fine! म्हणून निघून गेली.
ती का रडत असावी? अस का वागतात लोकं? आपल्या आसपास तर सर्व चांगलेच लोक असतात. अशी माणसे येतात कुठून? कुठे राहतात? मी ही घाबरते नेहमी अशांना बघितल्यावर मग आज शब्द कसे बाहेर पडले?
भितीची जागा जिज्ञासा ने घेतली होती.