Marathi Quote in Hiku by Mahesh

Hiku quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

रंग लेखणीचे
सहावा आठवडा :-
विषय ३. घटस्फोटाचे वाढते परिणाम
© mahesh

सध्या सगळीकडे एकच चर्चा होताना दिसून येते ती म्हणजे ' आज या या कारणावरून नवरा बायको मध्ये वाद विवाद झाले आणि नवऱ्याने बायकोला घटस्फोट दिला किंवा बायकोने नवऱ्याला घटस्फोट दिला '. तर हे असे होण्यामागे नक्की काय कारण असू शकेल याचा कधी कोणी विचार केला आहे का ??
पूर्वीपासून चालत आलेली पुरुषप्रधान संस्कृती आणि अलीकडील काळात पाश्चात्य संस्कृती चे वारेमाप अनुकरण यामध्ये कुठेतरी माणसाची विचार करण्याची क्षमता कमी किंबहुना नष्ट होताना दिसून येत आहे.कारण त्या संस्कृती मध्ये काही घटक असे आहेत की ज्याचा परिणाम आपल्या भारतीय संस्कृती वर फारच वाईट रित्या होताना दिसून येत आहेत.
मुळात घटस्फोट का घेतात ??.या मागे मुख्यतः काही कारणे असतात ती आपण पाहू !
१. मनाविरोधी विवाह :-
बरेचदा असे होते की अलीकडील काळात सोशल मीडियाचा वापर विवाह जुळवण्यासाठी केला जातो त्यामुळे कित्येकदा यात फसवणूक होण्याची शक्यता असते. दुसरे असे की वडीलधाऱ्या माणसांच्या दबावाखाली येऊन विवाह केला जातो त्यामुळे देखील दोघांमध्ये सख्य निर्माण होत नाही. जातीय प्रश्न असल्याने देखील काही वेळा मनाविरुद्ध त्याला अथवा तिला लग्नास होकार द्यावा लागतो. मग दोघांमध्ये विश्वास आणि प्रेम नसेल तर समस्या घटस्फोटापर्यंत येऊन पोचते.
२. 'त्याचे किंवा तिचे' लग्ना आधी काही अफेअर आहे का ही शंका येणे :-
विवाह करतेवेळी बऱ्याचदा खरी माहिती लपवली जाते ज्या मध्ये बऱ्याच गोष्टी असतात- प्रेमप्रकरण, काही घोटाळे, पण बदनामीच्या भीती खाली ते दबवले जातात. आणि विवाहा नंतर जर ह्या सर्व गोष्टी समजल्या तर प्रकरण खूप गंभीर होऊन बसते.
३. सोशल मीडियाचा गैरवापर :-
आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत असताना त्यातील बारकावे आणि सुरक्षितता जाणून न घेणे ही फार मोठी चूक आपल्या आयुष्याला काळिमा फासणारी ठरते. सोशल मीडियावर आपले वैयक्तिक फोटो प्रसिद्धीखातर पोस्ट करणे ही एक वाईट सवय आजच्या पिढीला लागलेली आहे. पण याचा गैरवापर करणारे देखील असतात याची त्यांना सुतराम कल्पना नसते. ही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे त्या फोटोंचा गैरवापर करून ब्लॅकमेल किंवा धमकी देणं अशा प्रकारे त्या कुटुंबाला त्रास देतात. परिणामी कौटुंबिक वाद विवाद होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत येऊन पोचते.
वरील कारणे ही घटस्फोट होण्यास कारणीभूत असतात. पण या घटस्फोटाचे जे काही वाईट परिणाम पुढील पिढीवर होतात ते पुढीलप्रमाणे पाहूया !
१. मुलांमध्ये एकटेपणाची जाणीव
आई वडील वेगळे राहायचे या विषयावर मुलांसमोर सतत बोलत असतील तर ते देखील नकारात्मक दृष्टीने बघतात आणि मानसिक संतुलन बिघडवून बसतात. अशी मुले नकळत गुन्हेगारीकडे जास्त आणि शैक्षणिक आणि व्यावहारिक जगाकडे कमी वळतात.
२. पोटगी आणि संपत्तीचा प्रश्न उपस्थित होतो
घटस्फोट घेतला तरी देखील मुलाचा/ मुलीचा ताबा कोणाकडे राहील यासाठी सतत कोर्ट कचेऱ्या चालू राहतात. संपत्तीच्या वाटणीमध्ये देखील बरेच अडथळे निर्माण होताना दिसून येतात. मनासारखी पोटगी मिळाली नाही तर त्याचा राग मनात धरून पुढे खून- मारामाऱ्या असे प्रकार घडतात.

-- mahesh

मातृभारती मार्गे सामायिक.. https://www.matrubharti.com/bites/111052042

Marathi Hiku by Mahesh : 111053515
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now