आठवण
तुला बघून काळ लोटला
होतंय अधीर माझं मन
आठवते तुझी डोळ्यांत साठवलेली मूर्ती
पण खरं सांगू?
या आठवणींना हि येते रे तुझी आठवण
पुन्हा देऊया उजाळा त्या सोनेरी क्षणांना
झुगारून सारे बंध जगूया स्वप्नांच्या कथा
पण नशीब खेळ खेळतोय
मी समजू शकते तुझ्याही व्यथा
होईल भेट,,, उजळून येतील आठवणी
वाट बघते त्या क्षणाची
असेल समोर तुझी मूर्ती
आणि बहरून येईल आपली प्रीती