झेप..
अश्रुंचे पाश तोड आता.. स्वप्नांच्या मागे दौड आता... ॥
आयत्या यशाचा गाव कोठे राहिला शून्यातून अस्तित्व निर्मितीचे धडे घे आता..॥
चांदण्यांची चादर सोड आता घामाच्या ठिपक्यांची रांगोळी नभी मांड आता..॥
जन्मापासून पायथ्याशी राहण्याच्या मर्यादा सोड आता.. क्षितिजा पल्याड उडणारी झेप घे आता... ॥
- साधना वालचंद कस्पटे©