बी.एड्. फिजीकल कांदिवली 7
ती वाक्यं फळ्यावरलिहिली. तीन चार मुलांकडून वाचून घेतली. माझा पाठ सुरू असताना प्रशालेचे सुपरवायझर फेरी मारून गेले. मग पाठ वाचला सोपे सोपे प्रश्न विचारले. शब्द नी वाक्यं मी न सांगताच मुलानी वहीत लिहूनघेतली. मग मुलांकडून पाठ वाचून घेतला. यात ३०मिनीटं होवून गेली नी घंटा झाली. मी धड्या खालचा स्वाध्याय घरी पूर्ण करायचा गृहपाठ देवून वर्गा बाहेर पडलो. कुलकर्णी सरानी माझी पाठ थोपटली. कांदिवलीत परत जाताना बिटला म्हणाला, “आमी तुला ऐरा गैरा समजलो हुतो. काल रातीला तुज्याकड आलो आसतो तर माजा पाठ पडला नसता. ह्ये लेसनचं काम लय आवघड हाय गड्या....... ”
ग़ोखले प्रशालेचे दोन्ही सुपरवायझर आणि सिनियर शिक्षक लेसनच्या वेळी नेहेमीच फेरी मारीत आणि कोणी अपुऱ्या तयारीचा असेल तर लगेच तक्रार करीत असत. या शाळेत आम्हा सात जणांचाग्रूपच शेवट पर्यन्त टिकला. तीच तऱ्हा उत्कर्षआणि सन्मित्र मध्ये! इतर शाळांमध्ये काहीही नी कसही खपून जायचं. सराव पाठ सुरू झालेनी माझे चांगले दिवस सुरू झाले. मालाडच्या मावशीचे मिस्टर दादरला शहाडे आठवले कापडदुकानात नोकरीला होते. मला त्यानी कापडाच्या ताग्यामध्ये वापरीत त्यातले वेगवेगळ्या आकाराचे पांढरे पुठ्ठे आणून दिलेले. मी कॅमल पोस्टर कलरच्या सहा बाटल्यांचा पॅक, वॅक्स कलर आणि दोन ब्रश खरेदी केलेले. माझ्या लेसन्सना लागणारी वर्ड कार्ड, फ्लॅश कार्ड आणिचित्रं मी स्वत: काढीत असे. पेन्सिल स्केच केल्यावर आऊट लाईन वॉटरप्रूफ़ काळ्या शाईचे रेखून मग त्यात पोस्टर कलर किंवा वॅक्स स्टिक ने रंग भरीत असे. त्यामुळे चित्रं चांगलीआकर्षक दिसत. ईयत्ता पहिली ते सातवी पर्यन्तच्या सर्व विषयांच्या पाठ्य पुस्तकात वेगेवेगेळी प्राणी पक्षी, माणसे व प्रसंग चित्रं मिळत. आमच्या कॉलेज जवळ अहमदाबाद हायवेच्या डाव्या अंगाला झोपडपट्टी सारख़्या असंख्य वसाहती होत्या.त्यात मराठी कुटूंब रहायची. तिथे फिरून खालच्या इयत्तांमधली मुलंगाठून मी त्यांची पुस्तकं घेवून मला पाहिजेती चित्रं तिथे बसून नकलून घेई. आमच्या टी शर्टवर कॉलेजचा लोगो छापलेला असायचा . त्यामुळे लोक शिक्षक म्हणूनमान देत असत.
लेसन सुरू झाले नी ईव्हिनिंग लेक्चर्स सुरू झाल्यावर टाइट शेड्यूल असे. संध्याकाळचीअसेंब्ली साडेसहाला संपायची. आमचा लेक्चर हॉल आमच्या होस्टेल पासून दहामिनीटं चालीच्या अंतराइतका दूर नी सगळा जीव घेणा चढणीचारस्ता. पावणे आठ पूर्वी जेवण उरकून बाहेर पडावच लागे. त्यात पुन्हा जेवल्या जेवल्या भराभर चाललं तरी पोटात दुखे. कॉलेज पासून स्टेशन, मार्केट एरिया दोन सव्वादोन कि.मी. दूर होता. त्यामुळे असेंब्ली नंतरचहा घेवून आलं की बाहेर फिरायला जाणं बंदच झालं . लेक्चर हॉलजवळ स्टोअर रूम, प्रिन्सिपल्सचेंबर, ऑफिस, लायब्ररी नी जनरल रूम, गेस्ट रूम्स, लेडिज हॉस्टेल आणि तीन चार स्टाफ क्वार्टर्स होत्या . त्या संपूर्ण एरिया भोवती आठ फुटी उंच काळवत्री दगडाची कंपाऊंड वॉल होती. एक पंधरा फुटी मेनगेट होतं. रहदारीसाठी साईडच दोन फुटी गेट होतं नी तिथे कायम वॉचमन असे. या एरियाच्या उजव्या अंगाला अहमदाबाद हायवे पर्यंत सुमारे पाऊण कि.मी. घसारी नी दरडी होत्या. आम्ही असताना तिथला काही भाग टाईम्स ऑफ इंडियाने घेवून इमारतींच बांधकाम सुरू केलेलं होतं.
अहमदाबाद रस्त्या पलिकडे मालाडची प्रसिद्ध'डोंगरी' झोपडपट्टी पसरलेली होती. तिथून बारा मिनिटात मालाड स्टेशनला जाता येत असे.कॉलेज प्रिमायसीसच्या भोवती झोपडपट्टी एरिया होता. उघडी गटारं आणि मध्ये-मध्ये सांड पाण्याची डबकी. त्या एरियात फिरताना दुर्गंधीमुळे नाक दाबून धरावं लागे. तसेच प्रचंडडास व्हायचे. संध्याकाळी असेंब्ली सुटायच्या वेळेला आमच्या डोक्यावर फूटभर वर्तुळाकार घेर करून डासांचे पुंजके रुंजी घालताना दिसत. म्हणून आम्हाला मच्छरदाणी वापरण्याचीसक्तीच केलेली होती. महिन्यातून दोनवेळा म्युनिसिपालिटीचे सफाई कामगार येवून सांडपाण्याच्या भागावर डिडिटीची फवारणी करीत. त्यांच्या खांद्याला धुराच्या गन लटकावलेल्या असत त्या सुरू करून रॉकेलचा धूर मारीत. त्यावेळी आम्ही रुम उघड्या ठेवीत असू. इतका धूर व्हायचा की श्वास घेणं कठिण व्हायचं. मग सगळेजण धावत मेन गेटकडे मोकळ्यावर जावून थांबत असू.
आमच्या कॉलेज प्रिमायसेसमध्येही रस्त्याच्या दुतर्फा करंजी नी जंगली पिस्त्याची झाडं होती. त्याना दोन वेळा बहर यायचा. डहाळीच्या शेंड्याला छोट्या पानाच्या मध्यभागी फुगवटा असे त्यात चणाडाळी एवढा गर असे तो गोडूस लागायचा. पिस्ते पूर्ण वाढल्यावर शेंगा सुकायच्या नी खळ खळ आवाज करीत सगळ्या आवारात पिस्त्यांचा खच पडत असे. मग आजुबाजूच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या बायका नी मुलं पोती घेवून येत आणिभरभरून पिस्ते गोळा करून नेत. पिस्ते शोधण्यासाठी चगाळा झाडून त्याच ढीग करून देत.त्यावेळी शिंदे -तांबे वॉचमन त्यांच्यावर नजर ठेवूनरहात. काही प्राध्यापक त्यांना पैसे देवून आपापल्या क्वार्टर भोवतीचा परिसरही साफ करून घेत असत. मेन गेटवर कायम वॉचमन असायचा नी कॉळेज संबंधिताखेरीज कुणालाही आत प्रवेश करता येतनसे. झोपडपट्टीतल्या बायका मुलं सुकी लाकडं जमवायलाही यायची तेव्हा वॉचमन त्यांच्यावर नजर ठेवून रहात असे. जमिनीलगतच्या फांद्यांचीही अधून मधून कंत्राटदार बोलावून छाटणी केली जायची. ती सुकल्यावर वॉचमन वर्दी देत की झोपडपट्टीवाले येवून सुकलेल्या डहाळ्या आपटून आपटून पानंझडकून लाकड जमवीत. त्या बदल्यात ती लोकं पडलेला पाचोळ्याचे जागोजाग ढीग करून देत. मग संध्याकाळच्या वेळी वॉचमन ते ढीग जाळून टाकीत असत. आसमंतात धूर झाला दोन दिवस डासांचा त्रासही जरा कमी व्हायचा.
लेक्चर्स सुरू झाली की वॉचमन कामासाठी बाजुला जाताना ग़ेट लॉक करीत असे. फक्त पहिल्या तासाला रोल कॉल होई. कारण अध्ये मध्ये कुणी विद्यार्थी पळून जायला चान्सच नव्हता. इथले दोन्ही वॉचमन शिंदे नी तांबे माझ्या परिचयाचे. तांबे तर राजापूर कुवेशीतले. एकदम खालच्या मेन गेटवर ड्युटी असली की त्यांच्या पैकीकुणी तरी सुपारी खायला माझ्या रूम वर यायचा. माझ्याकडे वाड्याचा प्रसिद्ध अडकित्ताहोता. त्याना चतुर्थित गावाहून येताना एकेक अडकित्ता आणून द्यायच मी कबूल केल होतं. प्राचार्य, प्रा. सानप मॅडम आणि प्रा. गोंदकर सर यांची लेक्चर्स वग़ळता इतर वेळी दोन लेक्चर्स झाली की, वॉचमनशी संगनमत करून मी रूमवर पळे. ते लॉक खोलून मला जावू देत. तीनचार दिवसानंतर मग प्रभू नी चावरेकर माझ्यासोबत यायला लागले. आमच्या बरोबरचे इतर काहीलोकही लेक्चर चुकवून प्रिमायसेसमध्ये भटकत असत. त्यामुळे आम्हीही तेच करीत असणार असं इतराना वाटायचं. म्हणून आमचं भांडं फुटलं नाही. आम्ही रूमवर जातानाआणि गेल्यावर एक पथ्य पाळीत असू. ते म्हणजे लेक्चर हॉल कडून येताना रस्त्याने कोणी येत नाही ना? हे सतर्क राहून पहातअसू. कारण रस्त्याचा कडेला तीन स्टाफ क्वार्टर्स होते. तसेच चुकूनही रूममध्ये लाईट सुरू ठेवीत नसू. कारण प्रा. कांगणे, प्राचार्य , प्रा. जाधव, प्रा. कुलकर्णी, डॉ. जोशी, प्रा. गोंदकर,सानप मॅडम प्रा. सबनीस आणि मेस मधले नोकर, होस्टेल समोरच्या रस्त्याने ये जा करीत असत.
आमचं कॉलेज जुनं त्यामुळे कांदिवली परिसरात आम्हाला चांगली आयडेण्टीटी होती. टीशर्ट वरच्या जी.सी.पी.ई.कांदिवली हा लोगो बघून अगदी स्टेशनवरचा टीसी सु्द्धा “कैसे हो मास्टरजी म्हणून आमचं स्वागत करी.” प्रभू , चावरेकर, राऊळ या आमच्या ग्रूपमधल्या लोकाना मी त्यांच्या पाठाना लागणारी रेखाटणं काढून देई. आरंभीचे पाठ सुरू झाले तेव्हा आमच्या ग्रूप मधले लोक आमच्या खोलीवर जमून चर्चा,रंगित तालिम करू. मग आजुबाजुच्यारूममधले लोकही येवून बसत. मी, प्रभु, चावरेकर, राऊळ शिक्षक म्हणून काम केलेले असल्यामुळे बरेच लोक आमची मदत घेवून तयारी करीत. (क्रमश:)