बी. एड्. फिजीकल भाग १३
मंजू ओरपेची आई तर शनिवारी मी येणार का याची चौकशी करीत असायची. निळू भाऊंकडे कमी पण ओरप्यांकडेच माझा मुक्काम असायचा. तिथेच बाजूच्या खरे काकांचा मुलगासुजीतही दहावीला जाणारा. त्याच्या आईला कळल्यावर मग सुजीतही यायला लागला. आमचे सरावपाठ सुरू झाल्यानंतरची गोष्ट. पाठ वेळेत पूर्ण व्हावा म्हणून मी प्रभू , चावरेकर यानासांगून ठेवलेलं असे. ते पाठ संपायला पाच मिनिटं उरली की मला खूण करीत, की मग मी उपयोजनपायरी सुरू करून वेळेत पाठ पुरा करी.
खरे काका नी ओरपे यांच्याशी गप्पा मारताना लेसन घेतानाचीही गोष्ट गंमतीचा भाग म्हणून सांगितली. त्याबरोबर ‘आलो हं ’ म्हणत खरेकाका उठून गेलेनी पाच मिनीटात रिकोचं अॅटोमॅटिक घड्याळघेवून आले.“ हे वर्षभरवापरलेलं आहे. ते पडलं म्हणून दुरुस्तीसाठी एका पार्टीने आणून दिलं. बील झालं होतं५० रुपये. मग देतो म्हणून तो जो गेला तो अजून उगवलेला नाही. हे तुला घे. ते विकणं मलाबरोबर वाटत नाही. आम्हा बाप मुलाकडे चांगली घड्याळं आहेत म्हणून वापरताही येत नाही.हे तुला घेवून टाक कायमचं......” ते घड्याळ पुढे ६/७ वर्षं मी वापरलं. मालाडला गेल्यावर मी माझ्या शाळकरी मावसबहिणी, भाऊ यांनाही ईंग्रजीच्या त्यांच्या वर्गाच्या पाठ्यक्रमातील व्याकरणाचा भागशिकवीत असे.तिथेही दोन-तीन मुलं एक्झरसाईझ सोडवून घ्यायला माझ्याकडे यायची.
मावशी कडे तीच्या दारात शेजारच्या बिऱ्हाडकरूचाव तिचा संयुक्त कट्टा होता. शेजारी राहणारे बेडेकरसर कोणाशी मिळून मिसळून न राहता फ़टकून वागणारे होते. माझी शिकवणी तिथेचमोकळ्यावर बसून चाले. असंच एकदा एका दहावीत जाणाऱ्या मुलीला मी डायरेक्ट स्पीच चा भागतासभर समजावून दिला. त्यादिवशी संध्याकाळी मावशीचे मिस्टर जेवण उरकून बाहेर कट्ट्यावरबसून सुपारी खात असताना बेडेकरसर बाहेर आले.मी कोण, कुठला, काय करतो याची चौकशी करून म्हणाले, “तरीच.....संध्याकाळीतो इंग्रजी व्याकरणातला भाग शिकवीत असताना ते सगळं मी ऐकलं. तुमचा पाहुणा हुषार आहे. तो ईकडे नोकरी करणार असेल तर पुढच्या वर्षी आमच्या शाळेत इंग्लिशचा शिक्षक भरायचा आहे. आमच्या हायस्कूलला त्याचं नक्की सिलेक्शन होईल. ”
डिसेंबरमध्ये एक आठवडा भर स्काऊट गाईड ट्रेनिंग साठीआमचा मढ मार्व्याला तंबू थाटून रहिवास झाला. त्यापूर्वी गेल्यावर्षीच्या बॅच मधला कोकणातलाचधोंड नावाचा एक माजी विद्यार्थी आम्हाला भेटायला आलेला. त्याने सहज बोलता बोलता सांगितलं की आता पुढच्याआठवड्यात तुम्हाला स्काउट गाईड ट्रेनिंगला मढ मार्व्याला बीचवर आठवडाभर तंबू ठोकूनरहायला नेतील. आता दोन तीन दिवसानी कधितरी तुमचे गट पाडतील त्यावेळी तुम्हाला गोलाकारधावायचा गेम आहे नी शिटी मारल्यावर तुम्ही आठ आठचे गट करायला सांगतील . तुम्ही त्यावेळीजे गट कराल तेच तुमचे टेण्ट मधले गट असतील. आम्हाली ही टीप मिळालेली असल्यामुळे मी,प्रभु, चावरे, गोवेकर, चौधरी, फडणीस, ओक, देवधर यानी सर्कलचा गेम सुरूझाल्यावर चलाखी करून व्हिसल वाजल्यावर एकमेकाना पकडून ठेवले. या गेमचा काय उद्देश आहेन कळल्यामुळे नेहेमी विशिष्ट ग्रूपिंग करणारेपुरते फसले होते.
दोन दिवसानी आम्ही मालाड मध्ये मढ मार्वे बीचवर गेलो.प्रा. कांग़णे आणि प्रा. जाधव ह्यानी मार्किंग करून दिल्याप्रमाणे मुलामुलींच्या गटानीवाळूत आपापले तंबू उभारले. पुढचा आठवडाभर हा बी.एड्.फिजीकल ट्रेनिंग मधला सर्वोच्च आनंदाचा काळ होता. आम्हीकोकणातली सगळीच मुलं पट्टीची पोहोणारी होतो. आम्ही खोल समुद्रात पोहत जात असू. तीनचार प्राध्यापक सुद्धा सोबत येत. बाकीच्यापैकी फक्त दोन तीन मुलं हे धाडस करीत. समुद्रातल्या उसळत्या लाटांमधे पोहोणं हे फार वेगळं तंत्र असतं. दोन रात्री शेकोटीचेकार्यक्रम झाले. यावेळी प्रत्येक गटाने अर्धा तास मनोरंजनाचा काहीतरी आयटम सादर करायचा होता. मी शाळेच्या कार्यक्रमात दशावतारी धर्तीवर अकरावा अवतार ही छोटी नाटिका सादर केलीहोती. त्यात ब्रम्हदेव, विष्णु, शंकर, नारद , चित्रगुप्त, यम, शेतकरी अशी पात्रे होती.फडणीसने चष्मा लावूनचशंकराचा रोल केलेला. ही नाटिका सगळ्याना खूप आवडली. प्राचार्यानी वन्समोअर देवून ती पुन्हा सादर करायला लावली. मेढेकर च्या गटाने तमाशातलीबतावणी सादर केली ती सुद्धा अप्रतिम होती. कृष्ण आणिपेंद्या गवळणींची वाट अडवून कोणाकडे काय काय आहे ते विचारतात. पहिली गौळण सांगते, “मी नेसलीया चंद्रकळा नी माठामंदी लोण्याचा गोळा.” पेंद्या म्हणतो, “त्येच्यावरचग्येला माझा डोळा, तू माठाचं त्वांड झाकलीस खरं पन खालतेसमदं उघडंच हाई की डेरा. नी डेरा बी तुजा यवडा मोटा की झाकता झाकंना.... ”
दुसरी गवळण सांगते, “ माज्या घड्यात हाय सायीचंधई नी मी नेसलीया जरीकाटी शालू ” त्यावर पेंद्या म्हणतो, “उनाच्या कारात तुमाला बगूनच हैरान झालू , आता कुटं कुटं नी कोना कोनाला डोळा घालू? बरंमावशे त्वा काय घेतलीयास दाव की....” मावशी झालेला मेढेकरपदर खाली पाडीत म्हणाला,“ मी ही अशी म्हातारी, मज्याकडंदावायसारखं कायपन नाय.... मी ह्या पोरीस्नी राखाय साटनं आलीया. ” पेंद्या हसत म्हणतो, “तू राखणार ह्यास्नी ? तुज्याकडं काय हत्यार कापत्यार...” त्यावर हात ओवाळीत मावशी सांगते, “आरं येड्या बोड्याच्या.... आपलं हत्यार कोन असं उघडं टाकतूया काय ...... हा किस्ना नी तू ...तुमापाशी बी नंबरी हत्यारं हायीतच की पर तुमी बी ती झाकूनच ठिवल्यात न्हवं .... ” पेंद्याम्हणतो “ते बी खरंच की, पर तुज्यापसलं काय कसलं हत्यार हाय ते दाकीव की …” मावशी कडोसरीची पिशवीउघडल्या सारखी करते. पेंद्या म्हणतो, “काय हाय त्ये? ”मावशी सांगते , “ आरं द्वाडा त्वा वापारलंस न्हायी का कदी? त्यात हायती ट्यूब टायर” पेंद्या म्हणतो, “त्ये आनी कशापायी?” मावशी हात ओवाळीत म्हणते,“आता माज्यासंगं ह्यादेकण्या तरण्या गवळणी ..... तुज्या किस्ना सारकं बाप्ये टकामका टकामका बगाय लागलेनी येकादी गौळण आलीच घोळात नी झाली पंक्चर तर काय करनार? म्हणूनघेतल्यात मी ट्यूब टायार....” प्रेक्षकानी भरभरून टाळ्या शिट्याघातल्या आणि प्राचार्यानी ती बतावणी तिथेचबंद पाडली.
स्काऊट कॅम्पमध्ये कबड्डी दामूनगरला टूर्नामेण्टलामिळालेल्या ५00रुपये बक्षिसाची पार्टी करायचा विचार पुढेआला. तिथे मासेमारी चालत असल्यामुळे मच्छी ताजी नी स्वस्त ही मिळे. मच्छी पार्टीला प्राध्यापकांसह ६० लोक होते. ४० शाकाहारींसाठी मुलींचा ग्रूप गुलाबजामुन करणर होत्या. यावेळी आबाचौधरीने लीड घेवून पाचशे रुपयाला दोन मोठेकानय मासे खरेदी केले. वसईच्या ज्युलियानेमेसच्या नोकराना हाताशी घेवून फ्राय पीस नी कडी असा बेत केलेला होता. मच्छी ची रसोई कॅम्प पासून लांब एका बाजुला थाटलेली होती.पार्टीच्यादिवशी कबड्डी ची कॉम्पिटिशन होती. फायनल राऊंडच्या वेळी त्रिपाठी नी मुच्छड थोरात यांचीबाचाबाची झाली. त्रिपाठी फुटबॉल चॅम्पियन होता. मुच्छड अंगावर गेल्यावर त्रिपाठीनेकाही कळण्यापूर्वी त्याच्या पोटात अशी किक् मारली की मुच्छड आडवा झाला. त्याने मुच्छडच्यापाठीत दोन किक मारल्या. आता त्याच्या ग्रूपमधले रंधवे, कुटे असे पाचसहा जण मिळून त्रिपाठीवर तुटून पडले. दोघानी त्याला उचलूनआपटला नी बाकिच्यानी बदा बदा लाथा मारल्या. मार खाता खाता त्रिपाठी , “साले एक बापकेहै तो एके एक करके आओ , देखेंगे किसमे कितना दम है....”असं बदबद्त होता. ऑफिशिएटिंगकरणारे सर त्यांची जुंपल्यावर बाजुला जावून टेण्टमध्ये बसले. त्यावेळी गुलाब जामुनकरीत असलेल्या विनोदबाला, कुंदन, सुषमा, शहा , चित्रे , मोने या मुली धावत जावून मध्येपडल्या. त्यानी त्रिपाठी भोवती अक्षरश: कडंकेलं तो पर्यंत बाकीच्या मुलीही गेल्या नीत्यानी थोरातच्या ग्रुपला बाजुला केलं नी त्याना शपथा घालून तंटा मिटवला . आश्चर्यम्हणजे मुच्छड नी त्रिपाठी दोघानीही मार पचवला होता. ( क्रमश:)