Memories of B.Ed. Physical - 10 in Marathi Moral Stories by Prof Shriram VKale books and stories PDF | बी.एड्. फिजीकल - 10

Featured Books
Categories
Share

बी.एड्. फिजीकल - 10

बी.एड्.फिजीकल कॉलेज,कांदिवली भाग१०

 त्यावेळचे पतियाळाचे  प्रख्यात कोच डॉ.डिक्रूझ हाफ स्टेपजंप आणखी डिस्कस थ्रो (थाळी)चं कोचिंग द्यायलाआठवडाभर आलेले होते.हाय जम्पचं ट्रेनिंग देताना ‘ते’ सर म्हणाले, "काळे,तुम् लक्ष देवून वेस्टर्न रोल स्टाईलची प्रॅक्टिस करा.तुम्हाला नक्की जमेल. त्यानी खास प्रॅक्टिस देवून मलावेस्टर्न रोल स्टाईल शिकवली.

   या इव्हेण्टमध्ये स्टार्टिंग पॉईण्टआणि जम्प घ्यायचा स्पॉट  अ‍ॅक्यु‍रेट ठरवावा लागतो हे प्रॅक्टिसकरताना मला नव्यानेच कळलं होतं. सुरुवातीला मी उडी मारण्यासाठी टेकॉफ घेतला कीबार क्रॉसिंगच्या  एक्झॅक्ट मोमेंटला सरमाझ्या पोटाखाली हाताचा सपोर्ट देवून लिफ़्टअप करीत . तीन-चार वेळेला असं झाल्यावर मीच सराना  म्हटलं,“ सर आता या खेपेला माझा मी ट्राय करतो.तुम्ही सपोर्ट नका देवू.” तरीही सर जय्यत तयारीत राहिलेले होते. त्यामुळे मलाखूप धीर वाटला नी मी परफेक्ट  स्टाईलमध्ये वेस्टर्न रोल केला.कोचींग करायचं याचा  एकउत्तम वस्तु पाठसरानी मला  शिकवला होता.मला हायजम्पची तंत्रं चांगली अवगत झाली.उंच उडीत माझा स्कोअर मार्कांच्या भाषेत सांगायचं तर ७०%म्हणजे मांडवे , नी मुच्छड थोरात पेहेलवानां पेक्षाहीजादा होता.  

        ऑक्टोबर अखेरीला आमचेशारिरीक शिक्षणाचे पाठ सुरू झाले. हेलेसन सुरू होण्याआधी हास्कूल मधून मुलं बोलावून जिममध्ये शारिरीक शिक्षणाचे डेमो लेसन झाले. यात प्रा.कांगणे, प्रा. सौ.सबनिस मॅडम आणि लिमये, त्रिपाठी,  चावरे, राऊळ,ओक, शहा, मोहिनी,सुषमा यांचे लेसन ठेवलेले होते. सगळ्यानीअगदी तंत्रशुद्ध सादरीकरण केलं. यानंतर शाळांमध्ये जावून प्रत्यक्ष सरावपाठ सुरू झाले.यामध्ये सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार, लेझिम-डंबेल्स- घुंगूर काटीचे प्रकार शिकवायचे असत.हे पाठ शाळेच्या मोठ्या सुटी नंतरम्हणजे साधारण अडीज वाजल्यानंतर व्हायचे. अगोदर ठरल्याप्रमाणे शाळेतले तीनवर्ग ग्राउंडवर येत.त्यांचे सहा गट करून एकावेळीसहा लेसन होत.सलग दोन तास झाल्यावर नवीन वर्गआणले जात. जानेवारीच्याहपहिल्या आठवड्यात सर्वांचेप्रत्येकी१३पाठ उरकले होते.उरलेले दोन पाठ ऑफिशिएटींगचे असायचे.कांदिवली, गोरेगाव, मालाड इथली महाविद्यालयं त्यांचा वार्षिक क्रीडामहोत्सव/स्पोर्टमीट आमच्या कॉलेज ग्राउंडवर येवून पूर्ण करीत असतयांच पूर्ण  नियोजन आणि  संयोजनआम्हा प्रशिक्षणार्थींकडून करूनहघेतलं जायचं.

        कॉलेजची स्पोर्ट मीटदोन - तीन दिवसहचालत असे. यातमहिला आणि पुरुषस्पर्धकां साठी १००/२००/४०० मीटर स्प्रिंटिंग,रिले, गोळा- थाळी - भाला फेक,लांब- उंच उडी हे प्रकार असायचे. संबंधित कॉलेजआम्हाला स्पर्धक यादी  आणि प्रत्येक फायनल इव्हेन्ट झाल्यावर यशस्वीताना पदकं देण्यासाठी कोणत्या प्राध्यापकाना  बोलवावं अशी यादीदेत असे. आम्ही आमच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली सगळं नियोजन करीत असू. या आयोजनात सर्व प्रशिक्षणार्थीना इव्हेण्ट घेणे आणिनोंदी  ठेवणेयात सहभागी करूनघेत असू. स्पर्धांच्या वेळी कॉलेजिसची कॅन्टिन लावलेली असत आणि आम्हा सर्वाना नाष्टा , चहा दुपारचं जेवण व संध्याकाळी पुन्हा चहा नाष्टा दिला जात असे.याची कूपन्स  दिली जात.स्पर्धा व्यवस्थित आणिहवेळेत पूर्ण करायचीमहत्वाची जबाबदारी अनाउन्सरवर असायची.त्यानी कॉल करून नियोजनाप्रमाणे एकेक आयटम पूर्ण करून घ्यायचाअसतो. या पाच जणांच्या टीममध्ये मी,चौधरी, ईसो, सुषमा,शहा होतो.

      दर दिवशी स्पोर्ट मीटचा आरंभ क्रीडा मशाल प्रज्वलित करून आमच्या कॉलेजमधलेहप्राचार्य व प्राध्यापक करीत.तसेच प्रत्येक इव्हेण्टच्या फायनल विनरला मेडल देण्यासाठी आमच्याकॉलेज मधल्या प्राध्यापकाना तसेच सुपरिटेण्डण्ट, ऑफ़िस बॉय, वॉचमन यानाही आम्हीपाचारण करीत असू.अनाउन्स मेण्ट करताना इसो अनाउन्समेण्ट करायला लागल्यावर मात्र  त्याचं प्रोनन्सिएशन साउथ इंडियनस्टाईलचं असल्यामुळे ऐकणारांची गल्लत व्हायला लागली.तसचआमच्या कडची आडनावं उच्चारताना तर तो भलतीच वाट लावायला लागला. तेंव्हा प्रा,कांग़णे व प्रा. शिंदे आले नी ईसोला  ऑफिशिएटिंगला घेवून गेले.स्पोर्ट मीटच्या वेळी खाण्यापिण्याची अगदी चंगळ असे. नाष्टा, लंच एकदम दर्जेदार असे.आम्ही प्रशिक्षणार्थिनी या स्पोर्ट मीट अगदी शिस्तीत आणि  कसलीही गडबड गोंधळ होवू न देता पार पाडून दिल्या. आम्हा सर्वांसाठी हे जणु आनंदपर्व होतं. स्पोर्टमीटच्या आठवणी आम्हा सर्वांच्या हृदयात जपून  ठेवलेल्या असतील. या मीट च्या वेळी  संबंधितकॉलेजिसमधले जी.एस्.,एल्. आर्., स्पोर्ट रिप्रेझेण्टिटीव्ह स्पर्धकाना मेडल द्यायला त्याना संधि द्यावीम्हणून आम्हा अनाउन्सरटीमला भेटून अगदी  गळेपडूपणाज्ञकरीत. काहीजण तर आम्हाला केक कोल्डिंक्ससुद्धा गिफ्ट करीत.तीन तासाच्या सेशनमध्ये मी त्यावेळी द्राक्षापासून बनणारं ‘सोसयो’नावाचं कोल्ड्रिंक सहा सात बाटल्या सहजी रिचवीत असे.

      सकाळ संध्याकाळी दोन दोन तासांच्याअसेंब्लित  माझी पार हबेलण्डी उडायची.पण आता रुटीन माझ्या अंगवळणी पडलंहोतं. योगासनात भलेभले चॅम्पियन मागे पडले. अगदी आरंभी पद्मासनाला खूप जणांंची  फासाफुशी झाली. त्यानंतरचं बध्दपद्मासन तर मी , फडणीस, ओक,आबा चौधरी अशा चौघानाच जमलं. पश्चिमोत्तानासन,हलासन, वृश्चिकासन, मयुरासन, तोलांगुलासन, बकासन  ही आसनंजवळ जवळ ७०% लोकाना बिलकूल जमली नाहीत.

     सेकंड टर्ममध्ये ४०० मीटरट्रॅकवर सकाळ संध्याकाळअसेंब्ली संपताना १० राऊंड मारावे लागत. जे लोक मागे राहिलेलेअसतील त्यांचे जेमतेम६ राऊंड होईतो व्हिसल होवून असेंब्ली संपायची.आम्ही काही लोक मुद्दामच अगदी रिकी रिकी धावतअसू. कान व्हिसल कधी होते इकडे लागलेले असायचे. असेंब्लींला तर मी इतका वैतागलेला होतो की कधि एकदा२६ जानेवारी उजाडतो याची मी वाट बघित असे कारण तो असेंब्लिचा शेवटचा दिवस होता.टर्म एण्ड सुटी संपवून १५ नोव्हेंबरला गावाहून परत आल्यावर उद्यापासून परत असेंब्लीचा ताप सुरू  असा विचार करून दिवस मोजीत असताना माझ्या लक्षातआलं की, नाताळ सुटी आणि रविवार वजा जाता आता असेंलीचे फक्त ४९ दिवस उरलेत.

       मग मी कागदावर तेवढ्या दिवसांचं  कोष्टक/टेबल बनवून ते दरवाजाच्या  मागील बाजूवर चिकटवून दिलं. दुसरे दिवशी असेंब्ली संपवून परत आल्या पहिल्या रकान्यात तिरकी रेष मारली. संध्याकाळी आल्यावर दुसरी रेष मारून फुली पूर्णकेली. आता फक्त४८ दिवस राहिले याने फार सुखावल्याची जाणीव झाली. दोन-तीन दिवसानी. चावरेलाही गंमत कळली. आठवडाभरात ही गंमत षटकर्णी झाली. ग्राउंडड्युटीच्या त्रासाला सगळेजणच जाम विटलेले होते.म्हणून एक एक काट मारून त्रास संपत चालला याचा मोठा दिलासामिळे. पुढे पुढेतर रोज असेंब्ली संपल्यावर खूप लोकमाझ्या रूमवर येवून दारामागे चिकटवलेलं ते टेबल डोळाभर पाहून जात. यात मुलीसुद्धा होत्या.कष्टाचा एकेक दिवस फुली मारून खोडतानाचा आनंद काही अवर्णनीयच होता.सुटकेचा दिवस जवळहजवळ येतो आहेहा आशावाद त्या कोष्टकामूळे जागृत व्हायचा तो फारच दिलासा देणारा होता.

कुणी आजारी असेलतर त्याला मात्रअसेंब्लीतून सुटका मिळायची.अर्थात  कॉलेजमध्ये डॉ .जोशी मेडिकलऑफिसर होते त्यांच्याकडून 'ए' चीट आणून द्यावी लागत असे.एखादा खरोखर आजारीअसेल तर त्याला तपासून डॉक्टर 'ए'चीट देत.मग त्याला असेंब्लीतून सुटका मिळत असे.बी चीट दिली तर त्यालाअटॅक्टिव्हीटितून सवलत असे.पण असेंब्लीला पूर्णवेळ हजर रहावं लागे.ए चीट असली रूमवर. झोपून रहायचीज्मु भा मिळते. डॉ.जोशी मुलांना तपासूनएक कि बी चीट द्यायचीते ठरवीत.रोज सकाळ संध्याकाळी असेंब्ली झाल्यावर दवाखाना उघडा असे.त्याना मदत करायला प्रभू आणि पाटीलहे दोघे जात असत. प्रभुवर त्यांची फारच मर्जी होती.प्रभू अधून मधून त्यांच्या कडून 'ए'चीट मिळवून मलादेत असे. कॉलेजमध्ये दर शनिवारी काही क्रीडाप्रकार, खेळ यांवरआधारित डॉक्युमेण्टरी दाखवीत असत. व्ही.टी.ला वेगवेगळ्या देशांच्या कॉन्सुलेट ना कॉलेजचं पत्र देवून अशा फिल्म आणल्या जात.अगदी सुरुवातीला मीआणि प्रभूवर प्राचार्यानी ते काम सोपवलं.शुक्रवारी दुपारी व्ही.टी.ला कॉन्सुलेट ऑफिसमध्ये फिल्म आणायला जायचं नी सोमवारी ती पोचवायला जायचं.शुक्रवारी संध्याकाळची असेंब्ली सहजच चुकायची. सोमवारी दुपारच्या लेक्चर्सना दांडी मारायचा चान्स मिळे. शिंदे प्यूननी सुपेकरांचा निरोप दिला की आम्ही दोघेही त्यांच्याकडून लेटर घेतअसू. (क्रमश: )