मश्रुम बटर मसाला
मश्रुम..
व्हिटॅमिन डी
बी 12
अणि कॅल्शियम चा जबरदस्त स्त्रोत..
कृतीच्या नावात जरी मसाला असले तरी फार मसालेदार नाही
बटण मश्रुम (जे बाजारात अथवा डी मार्ट मध्ये उपलब्ध असते..)आठ ते दहा
एक मोठा कांदा
एक 🍅 टॉमॅटो
गरम मसाला अर्धा चमचा
एक छोटा चमचा जिरे
कसुरी मेथी एक चमचा
तिखट एक चमचा
हळद अर्धा चमचा
साखर पाव चमचा
मीठ चवीनुसार
प्रथम मश्रुम धूवून त्यांचे देठ काढून टाका
मश्रुम चार चार उभे तूकडे करून घ्या
कांदा 🍅 टोमॅटो उभे चिरून घ्या
एका पॅन मध्ये दोन मोठे चमचे बटर घाला
बटर वितळले. सुगंध घरभर पसरला की
त्यात एक चमचा जिरे घाला
उभा चिरलेला कांदा घाला
कांदा थोडाच परातून
वर कसुरी मेथी घालावी
त्यानंतर टॉमॅटो च्या उभ्या फोडी घालून दोन मिनिट परतावे
आता हळद मीठ गरम मसाला तिखट घालून
चांगले परतून घ्यावे
मश्रुम तूकडे घालून पुर्ण मसाला त्याला लागेल असे परतावे
त्यावर झाकण ठेवण्यापूर्वी फक्त पाण्याचा एक हबका मारावा
दोन मिनिट झाकणं ठेवताच मश्रुम शिजतो
झाकणं काढून आवडत असल्यास पाव चमचा साखर घालावी परत थोडे एकत्र करावे
वरती कोथिंबीर घालावी
गरम गरम खायला घ्यावें
सोबत ब्रेड अथवा पोळी, पराठा मस्त लागतो
अत्यांत चविष्ट कमी वेळात होणारी एक पौष्टीक डिश 😊