🌱हिरव्या मुगाचा डोसा
🌱साहित्य
एक वाटी अख्खे हिरवे मूग
दोन मिरच्या
जिरे
मीठ चवीनुसार
किसलेले चीज
कोथिंबीर
बारीक चिरलेला कांदा
गाजर कीस
🌱कृती
एक वाटी मूग स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भरपूर पाणी घालून भिजवून ठेवा
मुगाच्या वरती एक बोट तरी पाणी हवे
🌱भरपुर भिजल्यावर मिरची जीरे घालून शक्यतो भिजवलेले पाणी वापरून बारीक वाटुन घ्या व बाजूला झाकुन ठेवा
🌱अर्ध्या तासाने जरूर असल्यास थोडे पाणी
व चवीनुसार मीठ घालून डोसे घाला
🌱 डोशावर गाजर कीस, कांदा व कोथिंबीर पसरुन घडी घालून घ्या
सोबत टोमॅटो सॉस..
🌱हा डोसा छान कुरकुरीत होतो 😋