💨ओट्स प्रोटीन डोसा
💨साहित्य
मसुर ,तूर ,उडीद ,मूग ,हिरवे मूग
या सर्व डाळी एक मोठी वाटी भरून
ओट्स एक मध्यम वाटी
जिरे
कोथिंबीर
गाजर कीस
चीज
मीठ
मिरची दोन ते तीन
आले दोन तिन तुकडे
💨कृती
आदल्या दिवशी रात्री सर्व डाळी भिजत टाका
सकाळी एक वाटी ओट्स
पंधरा ते वीस मिनिटे भिजवा
सर्व डाळी आणि भिजलेले ओट्स मिरची आले घालून वाटून घ्या
सात ते आठ तासात पीठ फुगून येते
डोसा करताना थोडे मीठ व जिरे घालून पीठ फेसून घेणे
गरम तव्यावर मध्यम आचेवर डोसा घालणे
कडेला तेल सोडून घेणे
डोसा कुरकुरीत झाल्यावर
डोश्यावर गाजर कीस, चीज कीस व कोथिंबीर घालून त्याची घडी घालावी
💨खुप चविष्ट व पौष्टिक डोसा तयार होतो 😋