#श्रावण
#गोडधोड
🔴श्रावण शुक्रवारी देवाच्या नेवेद्याच्या निमित्ताने गोड धोड केले जाते
एका शुक्रवारी पुरण तर नक्कीच असतें
पहिल्या शुक्रवारी मी केलेले रताळ्याचे गुलाबजाम
कोणताही पदार्थ करताना गृहिणीच्या मनात हे आपल्या व्यक्ती साठी आपण करीत आहोत ही भावना असतेच
यामुळेच तो पदार्थ वठतो
त्याची चव रुचकर बनते
असे म्हणतात कोणताही पदार्थ ओठांनी किंवा जिभेने खाण्या आधी तो डोळ्यांनी खाल्ला जातो
वासाचेही गारूड असतेच मनावर
आणि मगच तो मनपसंत वाटून
चवीने खाल्ला जातो
हा गुलाबजाम असाच डोळ्या सोबत जिभेचे पारणे फेडेल असा जमला आहे
🔴साहित्य
दोन मध्यम लाल रताळी उकडून
तीन ते चार मोठे चमचे तांदळाची पिठी भाजुन घेतली आहे
काजू पिस्ता बदाम बारीक चुरा सजावटी साठी ..
मैदा बिलकुल वापरला नाही
दोन वाटया साखरेचा वेलदोडे पावडर घालून थोडा पातळ सर पाक केला
🔴कृती
रताळी सालासकट पावभाजीच्या मॅशर ने बारीक करून घेतली
त्यात भाजलेले तांदळाचे पीठ हळूहळू घालत
त्याचा गोळा होईल असे मळून घेतले
जास्त वेळ न ठेवता पाचच मिनिटात
गोळे करून मंद आचेवर तुपात तळून घेतलें
साखरेच्या कोमट पाकात हे गुलाबजाम तास भर मुरायला ठेवलें
गुलाबजामचा घमघमाट घरभर पसरला होता
तासाभरात त्याच्या मूळ आकाराच्या दुप्पट फुलून
आले हे गुलाबजाम
(सोडा ना वापरता सुद्धा)
त्यावर फक्त ड्राय फ्रूट बारीक पुड पखरण केली
आणि याचा फोटो घेतला 😊
देवाला नेवेद्य दाखवून..
आता हे खायला तयार झाले