भीती ..!
कधीपासून पाहतोय “एकटक “तुझ्याकडे ..
तुझे मात्र मुळी लक्षच नाहीये ..माझ्याकडे .
वाऱ्याने आणल्यात बटा..साऱ्या कपाळभर ..
भीती कीती दाटून राहिलेय बघ तुझ्या डोळाभर
असे अनामिक भाव तुझ्या डोळ्यात पाहतोय ..
काय आहे ग संशय जो तुझ्या मनात राहतोय ..??
जगात तर असणार कायमच “आणीबाणी “..
सांग मग असे भिवून चालेलं का राणी !?
............................... वृषाली**