तरुण होती रात्र तरीही, चंद्र कसा झाकोळला गं.. रातराणी ती झुरत राहिली, गंधही मावळला गं.. गंध तो फिरुनी पुन्हा, रातराणीस हसवेल का गं ? तरुण होती रात्र तरीही..
नीज डोळ्यातून निघाली, नजर आता शून्यात पाही.. भिवविती दिशा या साऱ्या, तारकांची झाली लाही... दिसामाजी जे हास्य विझले, सांग ते गवसेल का गं? तरुण होती रात्र तरीही...Lotus 🪷💔❌