🟠मिश्र डाळींचे कढी गोळे
🟠 साहित्य
डाळी
मूग
मसुर
उडीद
हरबरा प्रत्येकी अर्धा वाटी
मिरची
कोथिंबीर ,कढीलिंब ,थोडे जिरे बडिशेप
नाचणी पीठ
मीठ चवीनुसार
🟠 कृती
सर्व डाळी रात्री भिजत घातल्या
सकाळी वाटताना त्यात मिरची कोथिंबीर कढीलिंब थोडे जिरे बडिशेप घातली
(हे वाटताना थोडे पाणी आवश्यक असेल तर घालू शकता)
या मिश्रणात मीठ व थोडे नाचणी पीठ घालून गोळे केले
मंद आचेवर तळून घेतलें
🟠कढी साठी ताकाला एक मोठा चमचा डाळीचे पीठ लावले
मीठ,गुळ, आल्याचे बारीक तूकडे घालून उकळत ठेवली
तुपात जिरे हिंग मेथी दाणे लाल मिरची कढीलिंब घालून फोडणी केली
गरम फोडणी या कढीत घालून उकळी आणली
🟠कढी गोळे
खायला घेण्यापूर्वी दहा मिनीटे कढीत गोळे बुडवून ठेवावेत व नंतर खावे
म्हणजे गोळ्यात कढी चांगलीं मुरेल
🟠 हे गोळे तळताना मंद आचेवर तळावे म्हणजे आतून कच्चे राहणार नाहित
🟠हे कढी गोळे पराठा अथवा भातासोबत खावे
नुसते सुध्दा छान लागतात