🟡चटपटीत मुगोरे..
🟡बाजारात मूग वड्या म्हणून मुगाच्या वाळवलेल्या वड्या मिळतात
त्या यात वापरल्या आहेत
या वड्या चवदार असतात कोणत्याही भाजीत पण वापरता येतात
🟡साहित्य
मूग वड्या दोन वाट्या
टोमॅटो एक
कांदा एक
गरम मसाला
तिखट मीठ
कोथींबीर ओले खोबरे
लिंबू
सजावट साठी कांद्याच्या रिंग
🟡कृती
प्रथम मुगाच्या वड्या मंद आचेवर तळून घ्या
तेलात बारीक चिरलेला कांदा घालुन चांगला परतून घ्या
लगेच टोमॅटो फोडी घालून एक मिनिट परता
त्यावर तिखट हळद व गरम मसाला घालून परतून घ्या
मीठ घालून
त्यावर तळलेले मुगोरे घालवून चांगलें एकत्र करून झाकण ठेवून एक वाफ द्यावी
वाढताना वर लिंबू पिळून कोथींबीर व खोबरे घालावे
कांद्याच्या रिंग ने सजवावे
खुप चविष्ट व खमंग लागतात