साडीचे गाणे
मी नेसते ग साडी नऊवारी
माझ्या साडीचा रंग लयभारी
माझ्या साडीची किनार सोनेरी
मी नेसते ग साडी सहावारी
माझ्या साडीचा पदर चंदेरी
साडीच्या निऱ्याची लगबग जरतारी
मी नेसते ग साडी कोल्हापुरी
कोल्हापुरी साडीवर कशीदा भारी
मोरपंख नाचतो वाऱ्यावरी
मी नेसते ग साडी पैठणी
साडीचा हौस आसमानी
माझ्या साडीचे नाव घरोघरी
मी नेसते ग साडी कांजीवरमी
माझ्या साडीची कीर्ती दूरवरी
या साडीसाठी झुरती नारी
मी नेसते ग साडी रेशमी
माझ्या साडीची शोभा जगावरी
लुगडी पातल साडी नावे भरपूरी
मी नेसते ग साडी भरजरी
शोभून दिसते माझ्या अंगावरी
इच्छा माझी व्हावी पुरी