वजन कमी करण्यासाठी दोरीच्या उड्या हा व्यायाम आपल्याला फायदेशीर ठरतो.
आपले आरोग्य तंदरुस्त तर आपण तंदरुस्त. चला तर वजन कमी करण्यासाठी दोरीच्या उड्या हा व्यायाम फायदेशीर कसा ठरतो हे आपण जाणून घेऊ. पूर्वीच्या काळात लहान मुलाचा हा खास व सगळ्याचा आवडता खेळ होता. ज्या मुळे खेळता खेळता मुलाचा चांगलाच व्यायाम होत होता. दोरीच्या उड्या हा व्यायाम एक इनडोअर व्यायाम असून त्याचे फायदे भरपूर आहेत.
जर का तुम्ही तुमचे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, नियमित पणे दोरीच्या उड्या मारल्याने तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल.
दररोज दोरीच्या उड्या मारल्याने आपल्या शरीरातील कॅलरी कमी होते. शरीरात भरपूर प्रमाणात चरबी साठलेली असते ती कमी करण्याचा हा सोपा मार्ग आहे. चरबी कमी झाली कि वजन आपोआप कमी होते. या साठी नियमित पणे काही मिनटे दोरीच्या उड्या मारणे गरजेचं आहे.
दोरीच्या उड्या मारल्याने आपल्या हृदयाची क्षमता वाढते व हृदय विकाराचा धोका सुद्धा कमी होतो.
आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी दररोज उड्या मारणे फायदेशीर ठरतो.
शरीराच्या आरोग्यासह आपल्या मानसिक आरोग्याला सुद्धा फायदेशीर आहे.
न चुकता जी मुलं दोरीच्या उड्या मारतात त्यांची उंची लवकर वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर मुलांच्या पाटीचा कणा, पाठ व पायाचे स्नायू यांच्यावर योग्य प्रमाणात ताण येतो. त्यामुळे उंची वाढण्यासाठी चांगलीच मदत होते.
Article By - Anjali Patil
Brainsmedia Solution