बंदिस्त हे मन
उडू पाहे सैरभैर...
अमर्याद त्या सीमा
आड येती वरचेवर...
बंधने ती झुगारून
करतो स्वतःशी मुजोरी...
कलह तो एकांताशी
ना तुटे ती घट्ट दोरी...
ना समजे त्याला
कसा होई तो मुक्त...
परतूनी त्याच वाटेने
तो होई तसाच विरक्त...
मनाचा मनाशी
चाले तो वाद...
कसा सोडवावा गुंता
न करता कुणाशी संवाद...
डंख देतात ते दात ओठ
स्वप्न पाहे तो अनेक...
गगन गवसण्या
पछतावे तो ठरे
धडपड ती नाहक...
परि मृगजळच ते
चाले अंतरी हा खेळ...
गूढ उकलता ना उकले
का ना बसे हा ताळमेळ...
विचारे स्वतः निवांत होत
...शोभा मानवटकर...