श्रीक्षेत्र दत्तभिक्षालींग मंदीर कोल्हापूर, ***कोल्हापूर शहरातील रविवारपेठ, आझाद चौकात श्रीदत्तभिक्षालींग मंदीर हे जागृत देवस्थान आहे. अतीप्राचीन काळापासून हे महत्वाचे आणि जागृत दत्तक्षेत्र आहे. मध्यान्हकाळी श्रीदत्तमहाराज या ठिकाणी माता जगदंबा कडून भिक्षा ग्रहण करतात.या स्थानी नवनाथांपैकी एक वटसीध्दनाथ यानी श्रीदत्तप्रभूना भिक्षा दान केले होते.तसैच श्रीगोरक्षनाथानी श्रीदत्तप्रभूना या क्षेत्री भिक्षेची झोळी दिली आणि भिक्षालींगाची स्थापना केली. श्रीदत्तप्रभू दक्षिणकाशी क्षेत्र असलेल्या कोल्हापूर येथेच मध्यान्हकाळी भिक्षा ग्रहण करतात. याच ठिकाणी गोरक्षनाथ महाराजानी श्रीसमर्थरामदसस्वामीना कुबडी प्रदान केली होती. ती आजही सज्जनगडावर आपण पाहू शकतो. या स्थानी दुपारी बाराच्या आरतीच्या वेळी श्रीदत्तप्रभूंचे अस्तीत्व जाणवते. ज्याप्रमाणे गाणगापूरला दत्तप्रभूंचा द्वितीय अवतार श्रीनृसींहसरस्वती महाराज दुपारी माधूकरी मागतात त्याप्रमाणेच स्वयंभू दत्तमहाराज येथे माधूकरी मागतात अशी श्रध्दा येथे आहे. श्रीदत्तमहाराज अखंड भ्रमण करत असतात. त्यांचे 1)वास्तव्य--मेरुपर्वतावर,, 2)स्नानासाठी--वाराणासी(गंगा),,,3)आचमन---कुरुक्षेत्र,,,,4)चंदनाची उटी---प्रयाग ,,5)दुपारची भिक्षा--करवीरक्षेत्र(कोल्हापूर),,,6)दुपारचे भोजन---पांचाळेश्वर बिड,,,7)तांबूलभाक्षण---राक्षसभूवन,,8)योगासाधना---गिरनारपर्वत,,,9)सायंसंध्या---पश्चीमकीनारा(कर्हाटकप्रांत कराड प्रीता संगम कृष्णाकाठा),,,10)प्रवचन किर्तन---नैमिषारण्य, बिहार,,,11)निद्रेसाठी---माहूरगड कोल्हापुरच्या य प्राचीन दत्तमंदीरात गेली शेकडो वर्षे अखंड आग्नीहोत्र दिवसाचे चोवीसतस सुरु असते. अष्टौप्रहर प्रज्वलीत अग्नी तीथे राखला आहे, आणि हे त्या पुजार्यानी पीढ्यानपीढ्या सांभाळले आहे. गीरनार पर्वताच्या खालोखाल हे दृत्तमंदीर महत्वाचे आहे.
---- *** --- *** --- ***